IMG-LOGO
राष्ट्रीय

मोदी सरकारचं ३० लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट

Wednesday, Oct 21
IMG

३० लाख गैर-राजपत्रित कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा बोनस ३७३७ कोटी एवढा असल्याचे जावडेकर म्हणाले.

नवी दिल्ली, दि. २१ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ३० लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. मोदींच्या कॅबिनेटने आज २०१९-२० साठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (पीएलबी) आणि नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी दिली आहे.  ३० लाख गैर-राजपत्रित कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा बोनस ३७३७ कोटी एवढा असल्याचे जावडेकर म्हणाले. त्यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली. बोनसची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे वळती केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा बोनस दसऱ्याच्या आधीच दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या ३० लाख ६७ हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच जम्मू-काश्मिरमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेलाही मंजुरी देण्यात आल्यामुळे तिथे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या धर्तीवर निवडणुका होणार असल्याचे जावडेकर म्हणाले.केंद्र सरकारचा कर्मचारी आता एलटीसीसाठी पात्र आहे, तसेच तो चार वर्षांच्या कालावाधीत दोनदा स्वतःच्या गावी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी दहा दिवसांचे पैसे घेऊ शकतो.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवास करण्यास मर्यादा आल्या आहेत, त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना एलटीसी भाड्याच्या तुलनेत रोख रकमेचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. कर्मचारी आता एलटीए किंवा एलटीसीच्या करमुक्त भागाच्या बदल्यात वस्तू व सेवा खरेदी करण्यास पात्र आहेत.

Share: