अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी वाहने पाठवण्यात आली आहे.
भीमसेन, दि. १७ : वाराणसीहून अहमदाबादला जाणारी १९१६८ साबरमती एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. ही गाडी रात्री अडीचच्या सुमारास भीमसेन स्थानकाजवळ रुळावरून घसरली. या गाडीचे २० डब्बे हे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित आहे. प्रथमदर्शनी एक मोठा दगड इंजिनवर आदळला व यानंतर ही गाडी रुळावरून घरसल्याची माहिती आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, दगड लागल्यामुळे इंजिनचा कॅटल गार्ड खराब झाला व गाडी ही रुळावरून घसरली. या घटनेनंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत.अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी वाहने पाठवण्यात आली आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून ती वळवण्यात आली आहे. अपघातग्रस्त गाडीचे डब्बे हे बाजूला केले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रयागराज विभागाचे डीआरएमही घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसने कानपूरला पाठवले जात आहे.