हावरा-मुंबई मेल एक्स्प्रेसचे पाच डब्बे रूळांवरुन घसरल्यानंतर बाजूलाच उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकले.
चक्रधरपूर, दि. ३० : झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये ट्रेन अपघात घडला आहे. आज पहाटे 3.45च्या सुमारास हावडा-मुंबई मेल रूळांवरुन घसरली आहे. एक्स्प्रेसचे १८ डब्बे रूळांवरुन घसरले आहेत. रेल्वेचे तीन डब्बे रुळांवरुन घसरल्याचे समोर आले आहे. सध्या या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची पुष्टी करत चक्रधरपूर रेल्वे मंडळाचे वरिष्ठ अधिकारी डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच चक्रधरपुर रेल्वे मंडळाचे अधिकारी चक्रधरपूर रेल्वे मंडळातून रिलीफ ट्रेन आणि जिल्हा प्रशासनाकडून रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना केल्या आहेत. सध्या कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर, प्रशासनाने हेल्पलाइन नंबरदेखील जारी केला आहे. हावरा-मुंबई मेल एक्स्प्रेसचे पाच डब्बे रूळांवरुन घसरल्यानंतर बाजूलाच उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकले.