IMG-LOGO
राष्ट्रीय

पेजर स्फोटानंतर भारत सरकार सतर्क; चीनच्या CCTV कंपन्यांवर लादणार बंदी

Tuesday, Oct 01
IMG

पेजर आणि इतर उपकरणांमध्ये लपवून ठेवलेल्या स्फोटकांनी हे हल्ले करण्यात आले.

नवी दिल्ली, दि. १ : भारत सरकार लवकरच देशात चिनी बनावटीच्या सीसीटीव्ही उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. लेबनॉनमध्ये नुकत्याच झालेल्या पेजर बॉम्बस्फोटानंतर सरकारने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  स्थानिक विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्व्हेलन्स मार्केटमध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची योजना आखत आहे.  लेबनॉनमधील पेजर स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार चिनी उत्पादनावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. इस्रायलने १८ सप्टेंबर रोजी लेबनॉनमधील हिजबुल्लाह कार्यकर्त्यांच्या हजारो पेजर आणि मोबाइल डिव्हाइसचा स्फोट घडवून आणला होता. यात अनेकांचा मृत्यू झाला होता. पेजर आणि इतर उपकरणांमध्ये लपवून ठेवलेल्या स्फोटकांनी हे हल्ले करण्यात आले. 

Share: