कायदे मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, की एखाद्याने सोशल मीडियावर टाकलेला चुकीचा कंटेट 24 तासांच्या आत काढावा लागेल. चुकीचे ट्वीट किंवा कंटेट कुणी पोस्ट केले, हे जाणून घेणे गरजेचे आहे
सरकारची समाज माध्यमांसाठी नियमावली; ओटीटीसाठीही नियामकनवी दिल्ली, दि. २५ फेब्रुवारी : केंद्र सरकारने सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजिटल न्यूजसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारने म्हटले आहे, की टीका आणि प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आहे; पण, सोशल मीडियावरील कोट्यवधी लोकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक फोरम असायला हवा. सरकारमधील दोन मंत्र्यांनी केलेल्या निवेदनाचा अर्थ असा आहे, की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले, तरी या स्वातंत्र्याचा गैरवापर केला, तर तुरुंगाची हवा खाण्याची तयारी ठेवा असाच आहे. कायदे मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, की एखाद्याने सोशल मीडियावर टाकलेला चुकीचा कंटेट 24 तासांच्या आत काढावा लागेल. चुकीचे ट्वीट किंवा कंटेट कुणी पोस्ट केले, हे जाणून घेणे गरजेचे आहे. सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ओटीटी आणि डिजिटल न्यूज पोर्टल्सबद्दल म्हटले, की त्यांच्याकडे स्वतःला नियंत्रित करण्याची व्यवस्था असावी. ज्याप्रमाणे चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड आहे, त्याचप्रमाणे ओटीटीसाठी एखादी व्यवस्था असावी. यावर दाखवले जाणारा कंटेट वयानुसार असावे. सोशल मीडिया क्रिमिनल, दहशतवादी, हिंसाचार करणा-यांना प्रमोट करणारे प्लॅटफॉर्म बनले आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे 50 कोटी युजर आहेत. फेसबुकचे 41 कोटी, इंस्टाग्रामचे 21कोटी आणि ट्विटरचे दीड कोटी युजर आहेत. या माध्यमांवर फेक न्यूज आणि चुकीचा कंटेट व्हायरल होत असल्याची तक्रार आली आहे. हा खूप चिंतेचा विषय आहे. यामुळेच आमच्या सरकारने अशा प्लॅटफॉर्मसाठी मागदर्शक सूचना तयार करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर कोट्यवधी युजर आहेत. सोशल मीडियाबाबत एखादी तक्रार दाखल करण्यासाठी एखादे फोरम असावे. जर न्यायालय किंवा सरकारी संस्था आक्षेपार्ह, चुकीचे ट्वीट किंवा मेसेजच्या फर्स्ट ओरिजिनेटरची माहिती मागत असेल, तर त्या प्लॅटफॉर्मला ती माहिती द्यावी लागेल. ही व्यवस्था फक्त भारताची अखंडता, एकता आणि सुरक्षा, याशिवाय सामाजिक व्यस्था, इतर देशांसोबतचे नाते, बलात्कार, लैंगिक शोषणसारख्या प्रकरणात लागू होईल. आम्ही मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला युजरची आकडेवारी सांगू. या प्लेटफॉर्मला तक्रारींचे निवारण करण्यासाठी मॅकेनिझम बनवावा लागेल. यासाठी एका अधिकार्याची नियक्ती करावी लागेल आणि त्याचे नावही सांगावे लागेल, असे मंत्र्यांनी सांगितले. या अधिकार्याला 24 तासात तक्रार दाखल करुन 15 दिवसांच्या आत त्याचे समाधानकारक उत्तर द्यावे लागेल.विशेषतः महिलांचा अपमान करणारे कंटेट किंवा फोटो 24 तासांच्या आत काढावे लागतील. या कंपन्यांना दर महिन्याला एक रिपोर्ट द्यावा लागेल. त्यात किती रिपोर्ट आले आणि त्याबाबत काय कारवाई केली, हे सांगावे लागेल. जर एखाद्या युजरचा कंटेट काढायचा असेल, तर त्याला याचे कारण सांगावे लागेल आणि त्याची बाजू ऐकावी लागेल.ओटीटी आणि डिजिटल न्यूजसाठी मार्गदर्शक सूचनाओटीटी आणि डिजिटल न्यूजसाठी तीन टप्प्यांचे मॅकेनिझम असावे. या सर्वांना आपली माहिती द्यावी लागेल. रजिस्ट्रेशनचे बंधन नाही; पण माहिती देणे आवश्यक आहे. त्यांना नियामक संस्था तयार करावी लागेल. त्यावर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक करावी लागेल. चित्रपटांप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मलाही प्रोग्राम कोड फॉलो करावा लागेल. सोशल मीडियासाठी जे कायदे बनवले आहेत, ते येणा-या तीन महिन्यांत लागू केले जातील.