बंदी सात जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली; मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली, दि. ३० डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती सात जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली; मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या या परिपत्रकानुसार 30 जानेवारी 2021 पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवेवर निर्बंध लागू राहणार आहेत. मात्र, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान वाहतुक सेवेचा समावेश नाही.