सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब आहे.
देशात 31 टक्के, तर महाराष्ट्रात 81 टक्के वाढ; सात दिवसांत एक लाख बाधितनवी दिल्ली, दि. २३ फेब्रुवारी : भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 14 हजार 199 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येसोबतच भारतामधील करोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटी 10 लाखांच्या वर गेला आहे. सात दिवसांत एक लाख रुग्ण आढळले असून, देशात रुग्णवाढीचा दर 31 टक्के, तर महाराष्ट्राचा दर 81 टक्के आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब आहे. दिवसोंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असून त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट अली की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेसंदर्भात सरकारी यंत्रणा आणि तज्ज्ञांनी स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली, तरी सध्या सुरू असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वांत मोठी वाढ आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधित रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात झाली. कोरोनावर आतापर्यंत एक कोटी सहा लाख 99 हजार 410 जणांनी मात केली. असे असले, तरी नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी आहे. फेब्रुवारी 21 रोजी संपलेल्या आठवड्यात भारतामध्ये कोरोनाचे एक लाख 990 रुग्ण आढळले. या पूर्वीच्या आठवड्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या 77 हजार 284 इतकी होती. म्हणजेच गेल्या आठवड्यामध्ये देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल 31 टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासांमध्ये सहा हजार 971 रुग्ण आढळून आले असून 35 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मागील 121 दिवसांमधील हा सर्वाधिक आकडा आहे. पुण्यामध्ये रविवारी कोरोनाचे एक हजार 176 नवे रुग्ण आढळून आले, तर सहा जणांनी कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात रविवारी प्राण गमावले. ागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 81 टक्क्यांनी वाढली आहे. 21 फेब्रुवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये महाराष्ट्रात 36 हजार 606 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा केली. केरळमध्येही कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले; मात्र तेथील परिस्थिती आता सुधारत आहे. मागील 24 तासांमध्ये केरळमध्ये चार हजार 70 करोनाचे नवे रुग्ण आढळून आले.परिस्थिती सामान्य व्हायला वेळजागतिक स्तरावर अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मरण पावणार्यांची संख्या पाच लाखांच्या जवळ जाताना दिसत आहे. जगातील सर्वाधिक कोरोना मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरण मोहीम संपूर्ण ताकदीनिशी सुरू करण्यात आली असली, तरी परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी बराच काळ जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.