IMG-LOGO
COVID-19

संक्रमण वाढले, देशात ४८ हजार ७८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Thursday, Jul 01
IMG

गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये (Coronavirus New Cases) वाढ दिसून येत आहे.

नवी दिल्ली, दि.  १ जुलै : देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज पुन्हा मोठी वाढ झाली आहे. देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत अडीच हजारांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये (Covid19 New Cases) वाढ दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24तासांत देशभरात 48786 लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. तर 991 लोकांचा बळी गेला आहे.  आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 3 कोटी 4 लाख 11 हजार 634 लोकांना देशभरात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली असून त्यापैकी 399459 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे

Share: