जगभरातील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी तब्बल ४० टक्के रुग्णसंख्येची नोंद दरदिवशी भारतात होत आहे.
नवी दिल्ली, दि. ४ : : देशात कोरोना संसर्गाच्या गती थोडीशी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालायाच्या आकड्यानुसार, मागील २४ तासात देशात कोविड-१९ चे नवे ३ लाख ५७ हजार २२९ रुग्ण सापडले. या दरम्यान देशात ३ लाख २० हजार २८९ जण कोरोनामुक्त झाले. तर या २४ तासात ३ हजार ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २ लाख ८२ हजार ८३३ झाली असून, त्यातील १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख २२ हजार ४०८ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ लाख ४७ हजार १३३ इतकी आहे. जगभरातील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी तब्बल ४० टक्के रुग्णसंख्येची नोंद दरदिवशी भारतात होत आहे.