नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी बेंजामिन यांनी सर्वांत प्रथम स्वत:वर लस टोचून घेतली. नेतन्याहू यांच्यासह इस्रायलचे आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांनादेखील कोरोनाची लस टोचण्यात आली.
इस्रायल, दि. २० डिसेंबर : अमेरिका, ब्रिटन, रशिया या देशांत कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असतानाच आता इस्रायलमध्येही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सर्वांत प्रथम लस टोचून घेतली. या लसीकरण कार्यक्रमाचे थेट प्रसारणही करण्यात आले.नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी बेंजामिन यांनी सर्वांत प्रथम स्वत:वर लस टोचून घेतली. नेतन्याहू यांच्यासह इस्रायलचे आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांनादेखील कोरोनाची लस टोचण्यात आली. या दोन नेत्यांनी फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात आली. पंतप्रधान नेतन्याहू आणि आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांना लस दिल्यानंतर करोना लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.