IMG-LOGO
राष्ट्रीय

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

Friday, Mar 29
IMG

मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार राहिला होता. अन्सारीवर ६५ पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.

दिल्ली, दि. २९ : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारी याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मुख्तार यानी अपक्ष उमेदवार असतानाही दोनदा विधानसभा निवडणूक जिंकली. सपा-बसपापासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष कौमी एकता दल स्थापन केला. मुख्तार पाच वेळा आमदार झाले आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर वाराणसीमधून नशीब आजमावले. त्याचा पराभव झाला. मुख्तार अखेर २०१७ मध्ये बसपाच्या तिकीटावर विधानसभेत पोहोचला. आपल्या मसल पॉवरच्या जोरावर त्यांनी आपला मोठा भाऊ अफजल अन्सारी याला संसदेत आणले आणि मोठा मुलगा अब्बास अन्सारी यालाही आमदार केले.मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार राहिला होता. अन्सारीवर ६५ पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. मुख्तार हा तुरुंगातूनही गँग चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. मुख्तार अन्सारी याचा एक भाऊ विद्यमान खासदार आहे. उत्तरप्रदेश सरकारने मुख्तार अन्सारीवर कारवाई करत जवळपास ६०५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. तसेच त्याचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय सरकारने बंद केले होते.

Share: