IMG-LOGO
राष्ट्रीय

किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद

Saturday, Sep 14
IMG

नायब सुभेदार विपिन कुमार आणि भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सचे कॉन्स्टेबल अरविंद सिंग हे शहीद झाले.

किश्तवाड, दि. १४ : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्याच्या वरच्या भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले. जम्मू काश्मीरच्या छत्रू भागातील नैदघम भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार घेराबंदी व शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात चार जवान गंभीर जखमी झाले होते. यातील दोन जवानांना वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. तर दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराला यश आले आहे. छत्रू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नैदघम गावाच्या वरच्या भागात पिंगनाल दुगड्डा जंगल परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती. यावेळी जंगलात लपून लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत लष्कराचे चार जवान जखमी झाले. तर असून त्यापैकी दोन जेसीओ नायब सुभेदार विपन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्करानेही दोन जवानांच्या हौतात्म्याला दुजोरा दिला आहे. नायब सुभेदार विपिन कुमार आणि भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सचे कॉन्स्टेबल अरविंद सिंग हे शहीद झाले. 

Share: