शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वायनाड, दि. ३१ : मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची ही घटना घडली आहे. या घटनेत दोन लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भूस्खलनात घडलेल्या ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. मेप्पाडी भागात मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारात भूस्खलानाची पहिली घटना घडली. त्यानंतर पुन्हा पहाटे चार वाजताच्या सुमारास आणखी एक भूस्खलन झालं. या घटनेत दोन्हीही भूस्खलानाच्या घटनेत आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.