IMG-LOGO
राष्ट्रीय

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली

Sunday, Oct 13
IMG

अनमोल बिश्नोई याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून कुख्यात टोळीत सामील झाल्याची कबुली दिली होती.

मुंबई, दि. १३  :  अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.  मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. या हत्याकांडानंतर काही तासांनी कुख्यात बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. सध्या केंद्रीय यंत्रणा त्याची सत्यता तपासत आहेत. ही पोस्ट शुभू लोणकर याच्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आली असून तो बिश्नोई टोळीचा साथीदार शुभम रामेश्वर लोणकर असू शकतो.  शुभम लोणकर याला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अकोला येथून अटक करण्यात आली होती. बिश्नोई टोळीशी त्याचे घट्ट संबंध असल्याचे मानले जाते. पोलिसांनी शुभमची चौकशी केली असता त्याने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून कुख्यात टोळीत सामील झाल्याची कबुली दिली होती.

Share: