मोबाइल अॅपद्वारे सामान्य लोकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा विवेकास्पद अॅपद्वारे होणा-या फसवुकीला बळी पडू नका.
ऑनलाईन तातडीच्या कर्जाची पठाणी वसुली; नातेवाइकांनाही त्रासमुंबई, दि. २४ डिसेंबर : तुम्ही कर्ज घेण्यासाठी मोबाईलमध्ये ऑनलाईन कर्ज देणारे अॅप डाऊनलोड केले असतील, तर सावधान. भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना तात्काळ कर्ज देणार्या अॅपबद्दल जागरुक राहण्यास सांगितले आहे. ब-याच अॅप्सच्या फसवणुकीवर त्रस्त झालेल्या ग्राहकांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही अशा अॅप्समधून कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर सावध व्हा, असा सावधगिरीचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील तीन लोकांनी ऑनलाईन अॅपद्वारे फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. या अॅप्सच्या माध्यमातून अनेक कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत. काही मिनिटांत कर्ज मिळेल असे अनेक कंपन्या सांगत असतात. त्या तसे कर्जही देतात; परंतु त्यावर 35 टक्के व्याज आकारणी केली जाते. कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती केली जात आहे. गुरुग्राम आणि हैदराबादमधील चार कर्ज अॅप फायनान्स कार्यालयांवर हल्लीच छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये दोन कार्यालये गुरुग्राम आणि दोन हैदराबादमध्ये आहेत. कंपनीविषयी तपास केला असता संपूर्ण फसवणुकीचे प्रकरण समोर आले. यामध्ये एका चिनी नागरिकाचाही समावेश आहे. हैदराबादचे सह पोलिस आयुक्त अविनाश मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार कार्यालयांमध्ये कर्ज देणारी 30 अॅप कार्यरत होती. ज्याच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत होती. कर्ज फेडण्यासाठी कंपनीने केलेल्या जाचामुळे सॉफ्टवेअर इंजीनिअर, तेलंगणाची एक महिला कृषी अधिका-यासह तीन लोकांना वेळेवर कर्ज फेडता आले नाही. त्यामुळे या तिघांचे शोषण करण्यात आलेय सगळ्यात धक्कादायक म्हणजे काही तास उशिरा पैसे दिल्यानंतरही त्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार ब-याचच लोकांनी पोलिस ठाण्यात केली आहे. मोबाइल अॅपद्वारे सामान्य लोकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा विवेकास्पद अॅपद्वारे होणा-या फसवुकीला बळी पडू नका. यासाठी खबरदारी म्हणून तुमचे केवासी कागदपत्र कुठेही शेअर करू नका. बँकेची खासगी माहितीही शेअर करण्याआधी विचार करा, असे आवाहन बँकेने केले आहे. कर्जदार कंपन्यांचे प्रतिनिधी कॉल करून अर्वाच्य भाषेत कर्जफेडीविषयी सांगतात. अनधिकृत डिजिटल लेन्डिंग मोबाइल अॅप व मंच यांवरून चटकन कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे अनेक गरजू त्याला बळी पडत आहेत.या प्रकारच्या कंपन्यांसाठी तुमचा मोबाइल क्रमांक हा ’युनिक आयडेन्टिफायर’ असतो. या क्रमांकावरून ते तुमचा सिबिल गुणांक काढतात. त्यावरून तुम्ही घेतलेले कर्ज किती वेळेवर फेडू शकता याचा अंदाज बांधता येतो. अशा प्रकारच्या डिजिटल लेन्डिंग कंपन्यांमध्ये चिनी गुंतवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे या प्रकारच्या अॅपवर तसेच मंचांवर बारीक लक्ष आहे.नातेवाइकांनाही त्रासअशा कंपन्या दैनंदिन गरजांपासून व्यावसायिक गरजांपर्यंत विविध कर्जे देत असल्यामुळे त्यांचा माग काढणे अवघड जाते. ज्याला कर्ज दिले आहे, त्याच्या आडनावावरून किंवा त्याच्या मोबाइल क्रमांकावरून कोणकोणते क्रमांक वारंवार डायल केले जातात ते पाहून त्या सर्वांना या कर्जासाठी तुम्ही जामीन आहात, असे सांगितले जाते. या सर्वांमागे घेतलेले कर्ज फेडण्याविषयी सतत कॉल केले जातात. त्यासाठी अत्यंत असभ्य व अर्वाच्च भाषा वापरली जाते. अशा कंपन्या देत असलेली कर्जे ही असुरक्षित कर्जे असतात.