IMG-LOGO
लोकसभा २०२४

लोकशाहीचा उत्सव : पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून देशवासियांना मतदान करण्याचे आवाहन

Friday, Apr 19
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशवासियांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई, दि. १९ : लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशभरातील १०२ आणि महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशवासियांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मतदान करण्याचे आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. त्यात त्यांनी मराठीतून ट्वीट करत म्हटले आहे, की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो. शेवटी, प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो! असे त्यांनी सांगितले आहे. अन्यायाच्या जखमांना मतदानाचे मलम लावाराहुल गांधी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय गेल्या दहा वर्षात झालेल्या अन्यायाच्या जखमांना मतदानाचे मलम लावा असेही त्यांनी म्हटले आहे. 

Share: