लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे.
मुंबई, दि. १३ : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. आज महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान पार पडतं आहे. पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे या आणि अशा सगळ्याच दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी १० राज्यांतील ९६ मतदारसंघात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात एकून ११ जागांवर मतदान होत आहे.