IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 Phase III : देशात तिसऱ्या टप्प्यात अंदाजे ६२.२७ टक्के मतदान

Wednesday, May 08
IMG

देशात तिसऱ्या टप्प्यात अंदाजे ६२.२७ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात देशात सर्वात कमी ५६.३७ टक्के मतदानाची नोंद झाली.

मुंबई, दि. ८ : बारामती लोकसभा, रायगड लोकसभा, उस्मानाबाद लोकसभा, लातूर लोकसभा, सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा, सांगली लोकसभा, सातारा लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा, कोल्हापूर लोकसभा, हातकणंगले या लोकसभा मतदार संघात मंगळवारी (दि. ७ ) मतदान पार पडले. पहिल्या, दुसऱ्या टप्प्यापाठोपाठ तिसऱ्या टप्प्यात मतदानाची आकडेवारी कमीच राहिली आहे. देशात तिसऱ्या टप्प्यात अंदाजे ६२.२७  टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात देशात सर्वात कमी ५६.३७ टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात मतदान किती ? लातूर- 60.18सांगली- 60.95बारामती- 56.07हातकणंगले - 68कोल्हापूर- 70.35माढा- 61.17उस्मानाबाद-  60.91रायगड- 58.17रत्नागिरी- सिंधुदुर्ग - 59.23 सातारा- 63.05सोलापूर- 57.61देशभरात ९३ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. यात सर्वात जास्त जागांसाठी गुजरातमध्ये म्हणजे २५ जागांसाठी मतदान होत आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ११, कर्नाटकात १४, छत्तीसगडमध्ये ७, पश्चिम बंगाल ४, आसाम ४, बिहार ५, मध्य प्रदेश ९, दादरा-नगर-हवेली, दमण दीव २, गोवा २, उत्तर प्रदेश १० अशा ठिकाणी मतदान झाले. 

Share: