IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगाची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधीना यांना नोटीस

Thursday, Apr 25
IMG

२९ एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत भाजप आणि काँग्रेसला या नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्ली, दि. २५ : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना निवडणूक आयोगाने मोठ पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवून उत्तर द्यायला सांगितलं आहे.२९ एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत भाजपा आणि काँग्रेसला या नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी धर्म, जात, समाज आणि भाषेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ अनुसार दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना उत्तर देण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.  काँग्रेसच सरकार सत्तेवर आल्यास ते देशाची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यामध्ये वाटू शकतात. पीएम मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक झाली. पंतप्रधान हिंदू-मुस्लिम करतायत असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. राहुल गांधी यांनी तामिळनाडूत भाषेच्या आधारावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपाने केला होता. राहुल गांधी आपल्या भाषणात भाषेच्या आधारावर उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात असा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता. लिखित तक्रारीत भाजपाने राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Share: