आता दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलिंडर १,६४६ रुपयांना मिळणार आहे.
दिल्ली, दि. १ : आजपासून गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर ३० रूपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळला आहे. आता १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज (१ जुलै) सकाळी बीपीसीएल आणि एचपीसीएल गॅस सिलिंडरचे दर मी करण्याची घोषणा केली आहे. आता दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलिंडर १,६४६ रुपयांना मिळणार आहे. आधी तोच गॅस सिलिंडर १,६७६ रुपयांना मिळत होता. तसेच मुंबईत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १,६२९ रुपये होती. आता १,५९८ रुपयांना मिळणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली असली तरी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.