IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

मनसेची निफाड तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर

Monday, Aug 17
IMG

नाशिक, दि. १७ ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शैलेश शेलार यांची निफाड तालुका अध्यक्ष तसेच शामराव उगले यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओझर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी निफाड तालुक्यासाठी नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.मध्यवर्ती कार्यालय ‘राजगड’ येथे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक व प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांच्या हस्ते  शैलेश शेलार, शामराव उगले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे आदि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जाफरशेठ पठाण, शिवाजी गवळी, शब्बीरभाई खाटिक, आकाश पेखळे, प्रकाश शिवले, योगेश पाटील, गिरीश कसबे, जयेश ढिकले, विशाल जाधव, समाधान पाटील, धनंजय साळुंखे, आदर्श भडके, शुभम उगले, विशाल उगले, अक्षय उगले, योगेश मोरे, जितेंद्र लदेल आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share: