जून 1991 ते मार्च 1992 या काळात देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. त्यांचे पुत्र भरतसिंह सोळंकी हेही माजी केंद्रीय मंत्री आहेत.
अहमदाबाद, दि. ९ जानेवारी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री माधवसिंह सोळंकी (वय 93) यांचे आज सकाळी गांधीनगर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. सोळंकी हे चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य अनेक नेत्यांनी तीव्र दु:ख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. जून 1991 ते मार्च 1992 या काळात देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. त्यांचे पुत्र भरतसिंह सोळंकी हेही माजी केंद्रीय मंत्री आहेत.