IMG-LOGO
COVID-19

राज्यात कोरोनाचे २,९४९ नवे रुग्ण, ६० जणांचा मृत्यू

Monday, Dec 14
IMG

राज्यात आज ४,६१० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४% एवढा झाला आहे.

मुंबई, दि. १४ डिसेंबर : आज राज्यात २,९४९ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ % एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १७,६१,६१५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.राज्यात आज ४,६१० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली,  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४% एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१७,४८,३६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८३,३६५ (१६.०३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०४,४०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share: