IMG-LOGO
COVID-19

महाराष्ट्रात दिवसभरात ७ हजार ३४५ रुग्णांना डिस्चार्ज

Monday, Dec 07
IMG

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२८ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,१८,७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५५,३४१ (१६.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई, दि. ७ डिसेंबर : आज राज्यात ३,०७५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. राज्यात आज ७,३४५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,३०,७१५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२८ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,१८,७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५५,३४१ (१६.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५५,१८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share: