IMG-LOGO
राष्ट्रीय

स्वतःचे नाव विसरेन;पण नंदीग्रामचे नाही, ममतांची भावनिक साद; उमेदवारी अर्ज दाखल

Wednesday, Mar 10
IMG

नंदीग्रामच्या बरतला इथे मतदारांना संबोधित करताना ममता म्हणाल्या, की मी एक हिंदू आहे. जे लोक 70 आणि 30 टक्क्यांचे कार्ड खेळत आहेत, त्यांनी सावध राहावे.

नंदीग्राम, दि. १० मार्च  : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्वत:चे नाव विसरु शकेन; पण नंदीग्रामला विसरु शकत नाही. नंदीग्रामची जनता मलाच मत देतील आणि त्यांचा विजय होईल, असे त्या म्हणाल्या. भवानीपूर माझे घर आहे. तिथे कुठलीही अडचण येणार नाही. एक दिवसाचा वेळ दिला तरी पुरेसा आहे. प्रत्येक कमिटी, प्रत्येक क्लब, हिंदू-मुस्लिम सर्वांचे प्रेम मिळत आहे. नंदीग्राम माझ्यासाठी नवा मतदारसंघ नाही. मी नंदीग्राम आंदोलनाला साथ दिली. तसेच शेतकरी आंदोलनासाठी 26 दिवस धरणे दिले होते, अशी आठवण ममता बॅनर्जी यांनी जागविली. ममता यांनी नंदीग्रामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर मुस्लिम मते जास्त असल्यामुळे नंदीग्रामची निवड केल्याचा आरोप केला होता. या पार्श्‍वभूमीवर ममता मुस्लिमांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण झाले उलटेच! त्यांनी सर्व शक्यतांना फोल ठरवत हिंदू कार्ड बाहेर काढले.नंदीग्रामच्या बरतला इथे मतदारांना संबोधित करताना ममता म्हणाल्या, की मी एक हिंदू आहे. जे लोक 70 आणि 30 टक्क्यांचे कार्ड खेळत आहेत, त्यांनी सावध राहावे. ममता यांनी व्यासपीठावरुन चंडीपाठसह अनेक मंत्रोच्चार केले. बराच वेळ त्या मंत्रोच्चार करत राहिल्या. आपण महाशिवरात्र नंदीग्राममध्ये साजरी करून मगच जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी नंदीग्राममधील महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.नंदीग्रामवासीयांना चहाचे वाटपनंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचे अजून एक रुप पाहायला मिळाले. शहरातील एका चहाच्या दुकानावर ममता यांनी थेट चहाची किटलीच हातात घेतली आणि सर्वांना चहा वाटला. ममता यांचे हे रुप पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

Share: