IMG-LOGO
राष्ट्रीय

कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले

Saturday, Sep 14
IMG

कांद्याच्या निर्यात शुल्कामध्ये देखील २० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली, दि. १४ : केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. देशांतर्गत अन्नधान्यमहागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) शुक्रवारी रद्द केले. तब्बल ५५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य (मिनिमम एक्स्पोर्ट प्राइज) हटवण्यात आले आहे. या सोबतच कांद्याच्या निर्यात शुल्कामध्ये देखील २० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयाचे परदेश व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी या बाबत एक अध्यादेश शुक्रवारी काढला. यामुळे कांद्यावरील निर्यातमूल्याची अट काढून टाकण्यात आली आहे. तर निर्यातशुल्क देखील निम्मे कमी करण्यात आले आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्यावर या पूर्वी असलेली ४० टक्के निर्यात शुल्क कमी करून २० टक्के केले आहे. गेल्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते.

Share: