आगामी सण-उत्सव काळातील अपेक्षित गर्दी टाळण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने सणवारांच्या काळात ‘उत्सव विशेष’गाड्यांच्या 196 फेऱ्या (एकूण 392 गाड्या) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाड्या 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात चालवल्या जातील.
नवी दिल्ली, दि. १३ ऑक्टोबर : आगामी सण-उत्सव काळातील अपेक्षित गर्दी टाळण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने सणवारांच्या काळात ‘उत्सव विशेष’गाड्यांच्या 196 फेऱ्या (एकूण 392 गाड्या) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात चालवल्या जातील. या गाड्यांसाठीचे तिकीटदर विशेष गाडयांच्या भाड्याप्रमाणेच आकारले जाईल. क्षेत्रीय रेल्वे कार्यालय या गाड्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर करतील.