IMG-LOGO
शेती

यंदा मॉन्सून १ जून केरळमध्ये होणार दाखल

Thursday, May 06
IMG

देशात सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्र लॉकडाऊन झाले आहेत.

नवी दिल्ली, दि. ६ मे : देशात आणि राज्यात मान्सूनचं वेळेत आगमन होणार असून समाधानकारक असा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाचा विचार करता 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. देशात सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्र लॉकडाऊन  झाले आहेत. मॉन्सून १ जूनला केरळमध्ये धडकल्यानंतर साधारणपणे ७ जूनपर्यंत त्याचे तळकोकणात आगमन होते. तर त्यानंतर १० जूनपर्यंत मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशा भाग व्यापून टाकतो. त्यानंतर १५ जूनपर्यंत  पूर्व भारतातील राज्य, गुजरात आणि मध्य प्रदेशाचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापतो. हवामान विभागानं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 98 टक्के कोसळण्याचा अंदाज आहे.

Share: