गुजरातच्या सुरत जागेसाठी भाजपच्या मुकेश दलाल यांच्यासह एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
सुरत, दि. ४ : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याआधीच भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय जाहीर करण्यात आला, गुजरातच्या राजकीय इतिहासात आतापर्यंतची ही पहिलीच घटना असून, पहिल्यांदाच निवडणूक न घेता इथं उमेदवाराचा बिनविरोध विजय घोषित झाला. गुजरातच्या सुरत जागेसाठी भाजपच्या मुकेश दलाल यांच्यासह एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व उमेदवारांनी निवडणुकीसाठीचा अर्जही घेतला होता. पण, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जवळपास ९ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली तर, काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज काही तांत्रिक कारणांमुळं रद्द करण्यात आला. ज्यामुळं मुकेश दलाल यांचा इथं बिनविरोध विजय झाल्याचं निष्पन्न झालं.