रुग्णवाहिका आणि एनडीआरएफची पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत.
म्हैसूर, दि. ११ : तामिळनाडूत शुक्रवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला. बिहारला जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसचे सहा डबे मालगाडीला धडकल्याने रुळावरून घसरले. हा अपघात ऐवढा भीषण होता की, रेल्वेच्या काही डब्यांना आग लागली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे म्हैसूरहून पेरंबूरमार्गे बिहारमधील दरभंगाकडे जात होती. दरम्यान, तिरुवल्लूरजवळील कवरप्पट्टाई रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला ही रेल्वेगाडी जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. कर्मचाऱ्यांनी बचवकार्यास सुरुवात केली आहे. रुग्णवाहिका आणि एनडीआरएफची पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत.