रोहिणी यांनी भाजपला धक्का देत त्यांचे वडिल एकनाथ खडसेंसोबत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
मुंबई, दि. १५ नोव्हेंबर : नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसेंना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: रोहिणी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. जळगावमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रोहिणी यांनी भाजपला धक्का देत त्यांचे वडिल एकनाथ खडसेंसोबत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे.