पवनच्या मृत्यूनंतर आता कुनो राष्ट्रीय उद्यानात २४ चित्ता उरले आहेत.
दिल्ली, दि. २८ : नामिबियावरून आणलेले चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात अधिवासात होते. याठिकाणी मंगळवारी पवन नामक चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. ५ ऑगस्ट रोजी कुनोमध्येच पाच महिन्यांचा आफ्रिकन चित्ता जेमीनीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसातच पवनच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. पवनच्या मृत्यूनंतर आता कुनो राष्ट्रीय उद्यानात २४ चित्ता उरले आहेत. त्यापैकी १२ मोठे आणि तेवढेच नवजात पिले आहेत. भारतात चित्त्यांचे आगमन झाल्यानंतर २६ मार्च २०२३ रोजी साशा मादीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उदय, दक्षा, तेजस, सूरज, धात्री, शौर्य आणि आता पवन यांचा मृत्यू झाला आहे. तर पाच नवाजत पिलांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण १२ चित्त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.