आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अद्भूत परिचय दिला होता”, असंही ते म्हणाले.
दिल्ली, दि. २६ : राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान अमर होतात. दिवस, महिने, वर्षे ,शतके जातात, परिस्थिती बदलते पण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्यांची नावे कायम अमर राहतात. हा देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा सदा सर्वदा ऋणी आहे. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. माझं सौभाग्य आहे की कारगिल युद्धाच्या वेळी मी देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपल्या सैनिकांच्या मध्ये होतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, अशी ग्वाही देताना त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनाही इशारा दिला आहे. कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. कारगिलमध्ये आम्ही, फक्त युद्ध जिंकलं नव्हतं तर आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अद्भूत परिचय दिला होता”, असंही ते म्हणाले.