६ ऑगस्टला नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
मुंबई, दि. १७ ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनावर लागण झाली होती. आज (१७ ऑगस्ट) त्यांना लीलावतीतून डिस्चार्ज देण्यात आला आहे.सुरुवातीला त्यांच्या घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्येत खालावल्याने त्यांना नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल केले होते. तेथे श्वसनाचे त्रास झाल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आयसीयुत दाखल केले होते.६ ऑगस्टला नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर १३ ऑगस्टला तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना नागपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्रास आणखी वाढल्याने शेवटी मुंबईला तातडीने त्यांना आणण्यात आले.