IMG-LOGO
राष्ट्रीय

नवाब मलिक यांचा उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम

Wednesday, Jul 31
IMG

वैद्यकीय जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम केला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो आहे.

दिल्ली, दि. ३१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता. मलिक यांनी अर्जात किडनी, यकृत, हृदय याच्याशी संबंधित व्याधी असल्याचं नमूद केलं होतं. आता नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम केला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो आहे.

Share: