IMG-LOGO
राष्ट्रीय

नेपाळमध्ये पंतप्रधानांच्या शिफारसीवरून संसद बरखास्त; एप्रिलमध्ये होणार निवडणुका

Sunday, Dec 20
IMG

नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आले असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात दोन गट पडले आहेत. एका गटाचे नेतृत्व के.पी. शर्मा ओली करत आहेत.

काठमांडू, दि. २० डिसेंबर : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाने संसद बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी ती मान्य केली आहे. राष्ट्रपतींनी देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे. आता नेपाळमध्ये 30 एप्रिल ते 10 मे दरम्यान दोन टप्प्यात निवडणूक पार पडेल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ओली सरकारनं राजधानी काठमांडूमधील सुरक्षा वाढवली आहे.ओली यांनी संसद विसर्जित करण्याची शिफारस केली असली तरी नेपाळच्या राज्यघटनेत याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ओली यांच्या या निर्णयाला नेपाळमधील राजकीय पक्ष कोर्टामध्ये आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेपाळच्या राष्ट्रपती, ओली सरकारच्या या शिफारशीवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.पंतप्रधान ओली यांच्या या निर्णयाला नेपाळच्या राजकीय पक्षांनी मोठा विरोध केला आहे. ओली सरकारमधील ऊर्जामंत्र्यांनीच या निर्णयाला विरोध केला आहे. ओलींच्या कम्युनिस्ट पक्षानंही यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 'कॅबिनेट बैठकीला एकही मंत्री उपस्थित नसताना पंतप्रधानांनी घाईघाईने हा निर्णय घेतला', अशी टीका कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायणजी श्रेष्ठ यांनी केली आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आले असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात दोन गट पडले आहेत. एका गटाचे नेतृत्व के.पी. शर्मा ओली करत आहेत. तर पक्षाचे वरिष्ठ नेते पुष्पकमल दहल प्रंचड दुसऱ्या गटाचे नेतृत्व करत आहे. संसद बरखास्त करण्याच्या हा निर्णय असंवैधानिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

Share: