IMG-LOGO
राष्ट्रीय

जगातील उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची किती? जाणून घ्या

Tuesday, Dec 08
IMG

2015 नेपाळमध्ये मोठा भूकंप आला होता. त्यानंतर असं बोललं जात होतं की माऊंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर राहिली नाही. यामुळे नेपाळ सरकारने एव्हरेस्टची उंची मोजण्याचं ठरवलं.

काठमांडू, दि. ८ डिसेंबर : नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे एव्हरेस्टची नेमकी उंची किती आहे याची आधुनिक साधनांनी मोजणी करून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार एव्हरेस्टची नेमकी उंची 8848.86 मीटर इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने सन 1954 साली एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यापेक्षा ही उंची 86 सेंटीमीटरने जास्त भरली आहे. त्यानंतरच्या काळातही जगातल्या सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या या पर्वताची उंची मोजण्याचे काम झाले आहे. त्या प्रत्येकवेळी त्यात काही ना काही फरक पडलेला आढळून आला आहे.2015 नेपाळमध्ये मोठा भूकंप आला होता. त्यानंतर असं बोललं जात होतं की माऊंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर राहिली नाही. यामुळे नेपाळ सरकारने एव्हरेस्टची उंची मोजण्याचं ठरवलं. नेपाळने चीनसोबत मिळून या काम केलं आहे. चीनने काही दिवसांपूर्वी 30 सदस्यांचं सर्वेक्षण दल नेपाळमध्ये पाठवलं होतं. माऊंट चोमोलुंगमा बेस कॅम्पवरुन एव्हरेस्टची चढाई या दलाने सुरु केली होती. चीन आणि नेपाळने संयुक्तरित्या माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम केलं.

Share: