IMG-LOGO
लोकसभा २०२४

ओम बिर्ला यांनी आणीबाणीचा उल्लेख करत तत्कालीन काँग्रेस सरकारवर ओढले आसूड

Wednesday, Jun 26
IMG

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हल्ला केला.

नवी दिल्ली, दि. २६  : ओम बिर्ला हे १८ व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. आवाजी मतदानाने बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र येत ओम बिरला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत घेवून गेले. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ओम बिर्ला यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. परंतू मोदींनी मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर बिर्ला यांनी अचानक आणीबाणीचा उल्लेख करत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेस सरकारवर आसूड ओढण्यास सुरूवात केली.  त्यामुळे विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही मग त्याविरोधात घोषणा सुरू केल्या.  तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हल्ला केला. भारताला संपूर्ण जगात लोकशाहीची जननी म्हणून ओळखले जाते. भारतात नेहमीच लोकशाही मुल्यांचे समर्थन केले आहे. अशा भारतात इंदिरा गांधी यांनी हुकुमशाही थोपवली, लोकशाहीची मुल्य चिरडली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, अशी टीका बिर्ला यांनी केला. ओम बिर्ला यांनी आणीबाणीचा उल्लेख करताना सांगितले की, आणीबाणी हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय होता. हे सभागृह आणीबाणी लादण्याच्या त्या निर्णयाची निंदा करत आहे. त्याचप्रमाणे त्यावेळी आणीबाणीला विरोध आणि संघर्ष करणाऱ्या तसेच लोकशाहीच्या रक्षणाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व लोकांच्या दृढ संकल्पाचे कौतुकही हे सभागृह करत आहे. 

Share: