पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट केल्याच्या वृत्तावर भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे
नवी दिल्ली, दि. १९ नोव्हेंबर : भारतीय सैन्याने पाकव्याप्त कश्मीरमध्ये पिनपॉईंट स्ट्राईक केल्याची बातमी गुरुवारी फेटाळून लावली. पीओकेमधील दहशतवादी तळ उध्वस्त केल्याच्या वृत्तावर भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे की, आज नियंत्रण रेषेवर कुठेही गोळीबार झालेला नाही. भारतीय सैन्य दलाचे सैन्य ऑपरेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी सांगितले, 'नियंत्रण रेखा ओलांडून पीओकेमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईची बातमी खोटी आहे.'