कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात आहे. कोरोनावर लस विकसित करण्यासाठी लस निर्मितीची प्रक्रिया अनेक देशांत सुरू आहे.
पुणे, दि. १० सप्टेंबर : ऑक्सफर्डकडून सुरू असलेल्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात स्वयंसेवकांना दिलेल्या डोसचे साईड इफेक्ट्स दिसल्यावर चाचणी थांबवली. मात्र, पुण्यातील सीरमने आपल्या चाचण्या सुरूच राहणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने सीरमला नोटीस बजावली होती. कोविड लसीची सुरू असलेली चाचणी बंद का केली नाही याविषयी स्पष्टीकरण मागत डीसीजीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात आहे. कोरोनावर लस विकसित करण्यासाठी लस निर्मितीची प्रक्रिया अनेक देशांत सुरू आहे. रशियाने लस निर्मिती केल्यावर सर्वांच्या नजरा या ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनका लसीकडे लागल्या आहेत. मात्र, याच्या चाचण्या आता थांबवण्यात आल्या आहेत.