येत्या 21 जूनपासून पेंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मोफत लस पुरवठा केला जाणार आहे.
नवी दिल्ली, दि. ८ जून : केंद्राने 1 मे रोजी लस खरेदीचे अधिकार राज्यांना दिले होते. त्यानुसार उत्पादन होणाऱया लसींचा 50 टक्के वाटा केंद्राला, 25 टक्के राज्यांना आणि 25 टक्के खासगी रुग्णालयांना देण्यात आला होता. मात्र, येत्या 21 जूनपासून राज्यांचा 25 टक्के वाटा केंद्राकडेच असणार आहे. त्यामुळे उत्पादन होणाऱया लसींचा 75 टक्के वाटा केंद्र सरकार खरेदी करून राज्यांना 21 जूनपासून मोफत लस पुरवठा करण्यात येईल.येत्या 21 जूनपासून पेंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मोफत लस पुरवठा केला जाणार आहे. यामुळे 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना विनामूल्य लस मिळेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मात्र ही मोठी घोषणा करतानाच पंतप्रधानांनी राज्यांना दिलेले लसीकरणाचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला होता. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांसाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2021 पर्यंत मोफत धान्य free foodgrains देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपर्यंत 80 कोटी गरीबांना मोफत धान्य free foodgrains दिलं जाणार आहे. या महामारीत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले. अशा सर्वांच्या दु:खात मी सामील आहे.या काळात आपण कोविड उपचार केंद्र सुरु करणे, आयसीयू बेड वाढवणे, टेस्टिंगसाठी लॅब उभारणे अशा अनेक आघाड्यांवर काम केले. यातून आरोग्य सेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणखी बळकट केल्या. ऑक्सिजनची मागणी या काळात मोठ्या प्रमाणात वाढली. रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी देशाने जगभरातून ऑक्सिजनसह महत्त्वाची औषधे मागवली.