IMG-LOGO
राष्ट्रीय

मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Saturday, Dec 19
IMG

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्ली, दि. १९ डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.“मा. गो. वैद्य हे अत्यंत नावाजलेले लेखक आणि पत्रकार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात त्यांनी कित्येक दशके महत्वपूर्ण योगदान दिले. भाजपाला अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती”. असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

Share: