IMG-LOGO
राष्ट्रीय

पंतप्रधान निवासातील गाईने दिला वासराला जन्म, मोदींनी केलं नामकरण

Saturday, Sep 14
IMG

या व्हिडीओत पंतप्रधान मोदी हे वासराबरोबर खेळताना दिसत आहेत.

दिल्ली, दि. १४ :  पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील ७, लोककल्याण मार्गावर असलेल्या घरात एका नव्या सदस्याचे आगमन झाले असून पंतप्रधान निवासस्थानातील एका गाईने वारसाला जन्म दिला आहे. पंतप्रधान मोदींनी या वासराचं नाव दीपज्योती असं ठेवलं आहे. तसेच त्यांनी हे नाव ठेवण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी एक्स या समाज माध्यमावर या वासराबरोबरचा व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.या व्हिडीओत पंतप्रधान मोदी हे वासराबरोबर खेळताना दिसत आहेत. तसेच आपल्या शास्त्रांत “गाव: सर्वसुख प्रदा:” असं म्हटलं गेलं असून दिल्लीतील ७ लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासात एका नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. पंतप्रधान निवासात असलेल्या गाईने एक वासराला जन्म दिला आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी या वासराचे दीपज्योती असं नामकरणदेखील केलं आहे. तसेच त्यांनी या मागचं कारणही सांगितलं आहे. या वासराच्या कपाळावर ज्योतीचे निशाण आहे. त्यामुळे मी तिचे नाव दीपज्योती ठेवले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Share: