IMG-LOGO
राष्ट्रीय

देशमुखांविरोधात परमबीर सर्वोच्च न्यायालयात

Tuesday, Mar 23
IMG

रश्मी शुक्ला यांनी देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलिस महासंचालकांना दिली होती

बदली आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी याचिकामुंबई, दि. २३ मार्च : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांची नि:पक्ष चौकशी करावी, पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती सिंग यांनी आपल्या याचिकेत केली आहे. रश्मी शुक्ला यांनी देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलिस महासंचालकांना दिली होती, असा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. सिंग यांनी शुक्ला यांच्या अहवालाचीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ज्या अहवालात, बदली आणि पोस्टिंगबद्दल गैरप्रकार झाल्याचा उल्लेख आहे. देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सत्य तपासणे आवश्यक आहे.देशमुख यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला शंभर कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट त्यांनी दिले होते, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. शुक्ला राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त असताना त्यांनीही पोलिस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये देशमुख यांच्याकडून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले होते; मात्र त्या वेळी याप्रकरणात देशमुख याच्ंयावर कोणतीही कारवाई न करता उलट शुक्ला यांंनाच सुनावण्यात आले, असा आरोप सिंग यांनी केला आहे. देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलिस अधिकार्‍यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे. इतकेच नाही, तर त्यांनी देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. सरकार आणि सुबोध जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्या मी होऊ देणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला होता. राज्य सरकारबरोबर पटत नसल्याने पुन्हा एकदा त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला होत जयस्वाल यांनीही सरकारकडे खळबळजनक अहवाल सादर केला होता. सरकारने तो लपवला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. जैस्वाल यांनी सरकारकडे अहवाल सादर केला होता. तपासानंतर पोलिस बदल्यांचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याचे पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले होते; मात्र तो स्फोटक अहवाल शासनाने हातोहात लपवला, असा सनसनाटी आरोप फडणवीस यांनी केला.सिंग यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणीपरमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी ही मागणी केली आहे. सिंग यांची बदली ही त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर केली, तरीदेखील त्यांनी याचिका दाखल केली आहे. यामागे कुणाचा हात आहे हे सर्वज्ञात आहे. दिल्लीला गेल्यानंतर एवढा बदल कसा होतो असा प्रश्‍न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. या अधिकार्‍याची मालमत्ता किती आहे याचा शोध घ्यावा. अधिकारी प्रामाणिक काम करत होते, की नाही हे महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या. त्याची चौकशी व्हावी. राज्य सरकारने अशा अधिकार्‍यांना पाठिशी घालू नये, असे ते म्हणाले.

Share: