IMG-LOGO
लोकसभा २०२४

18th Lok Sabha Session Update : PM मोदींनी घेतली खासदारकीची शपथ, आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकास्र

Monday, Jun 24
IMG

उद्या 25 जून, 50 वर्षांपूर्वी या दिवशी संविधानाला काळे फासण्यात आले. अशी काजळी देशात कधीही येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दिल्ली, दि. २४ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी बोलताना एकीकडे विरोधकांकडून सहकार्य आणि जबाबदार वागणुकीची अपेक्षा ठेवली असताना दुसरीकडे त्यांनी आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे. तसेच, देशाला संसदेत घोषणाबाजी नकोय, असंही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी ५० वर्षांपूर्वीच्या आणीबाणी कालखंडाचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केलं.उद्या 25 जून, 50 वर्षांपूर्वी या दिवशी संविधानाला काळे फासण्यात आले. अशी काजळी देशात कधीही येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू असं नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील जनतेला नाटक आणि कोलाहल नको आहे. देशाला घोषणांची नाही तर पदार्थाची गरज आहे. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची, जबाबदार विरोधी पक्षाची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. देशातील जनतेने आपल्याला तिसऱ्यांदा संधी दिली आहे. आमच्या जबाबदाऱ्या तीन पटींनी वाढल्या आहेत . म्हणूनच मी देशवासियांना आश्वासन देतो की आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही तिप्पट मेहनत करू आणि तिप्पट परिणाम साध्य करू. असे त्यांनी नमूद केली. १८ व्या लोकसभेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत असून ४ जुलैपर्यंत हे अधिवेशन चालेल. त्यानंतर ते स्थगित होऊन दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा २२ जुलैपासून सुरू होईल. तेव्हा देशाचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल. मात्र, त्याआधी नव्या खासदारांचा शपथविधी, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि त्यावर पंतप्रधानांचं उत्तर, खासदारांची भाषणं असा भरगच्च कार्यक्रम संसदीय अधिवेशनात असेल. अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर नव्या सरकारचं पहिलंच अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असताना सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण होताना पाहायला मिळत आहे.

Share: