IMG-LOGO
लोकसभा २०२४

Lok Sabha Session Update : एनडीए सरकारची 'परीक्षा'; आजपासून अधिवेशनाला सुरुवात

Monday, Jun 24
IMG

पेपर फुटीच्या प्रकरणांवरून सरकारचीच 'परीक्षा' असणार आहे.

दिल्ली, दि. २४ :  १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. खासदारांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात होणार असून, देशभरात गाजत असलेल्या पेपर फुटीच्या प्रकरणांवरून सरकारचीच 'परीक्षा' असणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनामध्ये भर्तृहरि महताब यांना लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ देतील. त्यानंतर महताब संसद भवनात पोहोचतील. सकाळी 11 वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होईल. लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंह सभागृहाच्या पटलावर निवडून आलेल्या खासदारांची यादी ठेवतील. त्यानंतर महताब सभागृह नेते म्हणून पंतप्रधान मोदी यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी बोलावतील. त्यानंतर नवनिर्वाचित खासदारांना 24,25 जून रोजी शपथ दिली जाईल.   आज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल. तसेच सर्व खासदारांना शपथ दिली जाणार आहे. यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणही होणार आहे.

Share: