पंतप्रधान मोदींनी या जागेची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्ली, दि. १४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी स्वामी विवेकानंदांना समर्पित या स्मारकाला भेट देतील आणि १ जूनपर्यंत या स्मारकातील ध्यान मंडप येथे ध्यान करतील, असे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौर्याची व्यवस्था करणार्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान आधी तिरुवनंतपुरमपर्यंत विमानाने जातील आणि त्यानंतर एमआय-१७ हेलिकॉप्टरने कन्याकुमारीसाठी रवाना होतील. ते १ जून रोजी परततील आणि तिरुवनंतपुरम विमानतळावरून दुपारी ४.१० वाजता आयएएफ विमानातून दिल्लीला जातील. स्वामी विवेकानंद स्मारकाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या जागेची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. २०१९ सालीदेखील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वी पंतप्रधान मोदी केदारनाथ दर्शनाला गेले होते. त्याआधी २०१४ च्या निवडणुकीत ते प्रतापगडावर गेले होते.