संसदेत मंगळवारी एनडीए-३.० सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे.
दिल्ली, दि. २२ : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी ‘इंडिया’ आघाडीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी संविधानाचे उल्लंघन करत पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा अडीच तास प्रयत्न केला. लोकशाहीमध्ये अशा प्रकारांना स्थान नाही, असे मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला मोदींनी दिलेल्या उत्तरावेळी लोकसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता.संसदेत मंगळवारी एनडीए-३.० सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याबद्दल मोदी म्हणाले की, हा अर्थसंकल्प अमृतकाळातील स्वप्नांच्या पूर्ततेसाठी महत्त्वाचा असेल. आमच्या सरकारच्या पाच वर्षांच्या योजनांचा आराखडा त्यातून मांडला जाईल. २०४७ मध्ये विकसित भारताच्या उद्देशपूर्तीसाठी या अर्थसंकल्पातून पाया घातला जाईल, असे मोदी म्हणाले.