IMG-LOGO
राष्ट्रीय

माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे चिंतेत : नरेंद्र मोदी

Sunday, Jul 14
IMG

ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

दिल्ली, दि. १४ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात एका ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  हल्लेखोराला देखील ठार करण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती देखील जो बायडन यांनी दिली. ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. या हल्ल्यावरून मोदी यांनी चिंता व्यक्त केली. यासह “राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला थारा नाही.” अशा शब्दांत मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला. मोदी यांनी म्हटलं आहे की माझे मित्र व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. राजकारण व लोकशाहीत हिंसेला थारा नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेन. आम्ही या हल्ल्यात निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले अमेरिकन नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. असे म्हटले आहे. 

Share: