पंतप्रधान मोदी यांनी कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान सुरू केलं आहे.
कन्याकुमारी, दि. ३१ : मागच्या दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला होता, आज तो थंडावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा देत जोरदार प्रचार केला. यादरम्यान त्यांनी २०६ सभा आणि रोड शो घेतले. तर ८० हून अधिक मुलाखती दिल्या. दरम्यान, प्रचारसभांचे द्विशतक झळकवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ध्यान करण्यास सुरुवात केली आहे.पंतप्रधान मोदी यांनी कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान सुरू केलं आहे. आज सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी इथं ध्यान करण्यास सुरुवात केली. ते पुढील ४५ तास ध्यान करणार आहेत. या काळात ते मौन राहणार असून केवळ नारळाचं पाणी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा आहार ते घेणार आहेत.